नाणूस बेतकेकरवाडा देवीच्या होमकुंड जत्रेला १३ एप्रिल पासुन सुरुवात.
१४ एप्रिल रोजी पारंपरिक कौलोत्सव.
वाळपई/प्रतिनिधी
सत्तरी तालुक्यातील नाणूस येथील सातेरी ब्राह्मणी महादेव देवस्थानाचा सुप्रसिद्ध जत्रोत्सव १३ एप्रिल रोजी साजरा होणार आहे.
यावेळी आगळ्या वेगळ्या स्वरूपाची आख्यायिका आपल्या देवस्थानाच्या जत्रोत्सवाचा महत्त्वाचा भाग म्हणजे सुमारे शंभर धोंडगण अग्निदिव्य पार करणार असल्यामुळे या जत्रोत्सवाला वेगळे असे महत्त्व प्राप्त झाले आहे. यागावातील धार्मिक संस्कृतीचे क्षेत्रात या जत्रोत्सवाला वेगळे असे अनन्यसाधारण महत्त्व असून गोव्यातील सुप्रसिद्ध शिरगाव येथील लईराई देवस्थानाच्या पूर्वी होणारा हा जत्रोत्सव म्हणजे लईराई देवीच्या सुप्रसिद्ध जत्रेची ही सुरुवात असल्याचे त्यांचे मत आहे.
वाळपई नगरपालिका क्षेत्रातील नाणूस बेतकेकरवाडा हा गाव ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. शेकडो वर्षाची परंपरा लाभलेला सातेरी ब्राह्मणी महादेव देवस्थानाचा हा जत्रोत्सव गोमंतकात वेगळ्या धर्तीवर सुप्रसिद्ध आहे. यंदा हा जत्रोत्सव १३ एप्रिल रोजी साजरा होत असून यामुळे गावांमध्ये देवस्थानाच्या पूर्वतयारीसाठी गावकरी व भाविकांनी मोठ्या प्रमाणात कार्य सुरू केले आहे .देवस्थानाची रंगरंगोटी करण्याबरोबरच गावामध्ये धार्मिक स्तरावर वातावरण निर्माण करण्यासाठी धोंडगणाचे व्रत पंधरा दिवसापासून सुरू झाले असून आज मंगळवारपासून सर्वजण एकत्र देवस्थानच्या प्रांगणात वास्तव्य करीत आहेत. काही धोंड गणानी गेल्या पंधरा दिवसांपासून अत्यंत व्रतस्थ राहण्यास सुरुवात केली असून हे दोन दिवस जत्रा जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. दिनांक १३ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता सातेरी देवस्थानाच्या प्रांगणातून देवीची कळस मिरवणूक भाविकांच्या उपस्थितीत महादेव देवस्थानाकडे येणार आहे. यावेळी देवस्थानचे व्रत पाळणारे सर्व धोंड सदर मिरवणुकीमध्ये सहभागी होणार असून सातेरी ब्राह्मणी महादेव देवस्थानाचा जयघोष करीत ही मिरवणूक रात्री दहा वाजता महादेव देवस्थानात पोहोचल्यानंतर लिलावाची प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे. नंतर मध्यरात्री
गावातील नाट्यकलाकाराचा” आता माझी सटकली ” नाटकाचा प्रयोग
सादर करण्यात येणार असून पहाटे साडेतीन वाजता व्रतस्थ धोंडगण अग्निदिव्य पार करणार आहेत .याची पूर्वतयारी पूर्ण झाली असून गेल्या दोन दिवसांपासून या भागातील नागरिक व भाविक होमकुंड करण्याची तयारी युद्धपातळीवर करीत असल्याचे पहावयास मिळत आहे.अग्नीदिव्य पार आल्यानंतर सकाळी 11 वाजता भाविकांना कौल देण्याचा कार्यक्रम होणार आहे. दिनांक १४ एप्रिल
रोजी देवीचे कळस गावातील प्रत्येक घराघरात जाणार असून यावेळी धार्मिक व पारंपरिक पद्धतीने पूजाअर्चा करण्यात येणार आहे. यासंबंधी अधिक माहिती देताना भागातील ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले की शेकडो वर्षाची परंपरा या जत्रोत्सवाला लाभलेली असून सातत्याने धार्मिक व पारंपरिक पद्धतीचे अधिष्ठान लाभलेला हा जत्रोत्सव म्हणजे गोमंतकातील भाविकांना वेगळ्याच प्रकारची ऊर्जा निर्माण करून देणारी प्रक्रिया आहे. पूर्वीची पारंपरिक पद्धत आजही त्याच धर्तीवर कायम करण्यात आली असून यामध्ये कोणत्याही प्रकारच्या नाविन्यता येणार नाही जेणेकरून धार्मिक अधिष्ठानाला बाधा पोचू शकते यापासून भाविक व नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे नागरिकांनी यावेळी स्पष्ट केले.
जत्रोत्सव तयारी जोरदार पद्धतीने सुरू आहे. होमकुंड तयार करण्यात आले आहे.(सग्रहीत)