बातमी Share करा:

आमच्याविषयी


नमस्कार, म्हादय वार्ता वाचकांचे आम्ही मनापासून स्वागत करतो.

नियमित व सतत नवे काहीतरी शिकण्याची आवड असणाऱ्या एका जिज्ञासू तसेच चोखंदळ वाचकाला सेवा, माहिती व वाचनखाद्य पुरवणाऱ्या संबंधित माध्यमाची माहिती नक्कीच असायला हवी, किंबहुना ती माहित असणे त्यांचा अधिकारच आहे.

आज वर्तमानात माहितीचा ओघ व प्रसारमाध्यमांची अफाट गतीने वाढ होत आहे. यांत्रिकीकरण, आधुनिक माहिती तंत्रज्ञान, आंतरजाल, डिजिटलीकरण व संबंधित अनेक अद्ययावत प्रणालींचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम माध्यमांवर पडतो आहे आणि कालानुरूप अनेक माध्यमे, त्यांचे धोरण, तत्त्व, ध्येयही हे बदलू लागली आहेत. मात्र, पत्रकारिता असो वा माहिती आदानप्रदानाचे इतर माध्यम असो, त्यातील तत्त्वे, कार्यपद्धती व भूमिका ह्या कुणाच्याही प्रभावाखाली न येता निष्पक्ष व निर्भीड पद्धतीच्या असायला हव्यात. दरम्यान, मराठी पत्रकारितेची हीच मुलभूत तत्त्वे व माहिती संप्रेषणाची मूलतत्त्वे अंगभूत मानून नव-संकल्पनांसह व दृढतेने वाचकांच्या सेवेसाठी, लोकमानसासाठी व जनशिक्षणासाठी उभारलेले ‘म्हादय वार्ता’ हे एक सर्वांसाठीचे अभिनव तसेच अभूतपूर्व उपक्रम व अभिव्यक्ती व्यासपीठ आहे.

‘म्हादय वार्ता’ (www.mhadaivarta.in) हे मराठी भाषेतील माहिती व विश्लेषणात्मक पत्रकारितेचे एकमेव ई-व्यासपीठ अथवा संकेतस्थळ आहे. हे व्यासपीठ सर्वांसाठी खुले असून, सर्वांच्या अभिव्यक्ती, मत व आवाजाला एकसमान लेखणारे व समान न्याय देणारे आहे. बातम्या, विविध घडामोडी, त्यांचे विश्लेषण, ज्ञानवर्धक मजकूर, मतमतांतरे, अभिनव उपक्रम, मराठी भाषेशी व महाराष्ट्राशी संबंधित नवसंकल्पना, तसेच साहित्य (लेख, ललित, कथा, कविता, पुस्तक परीक्षण व इतर लिखाण) आदी प्रकाशित करणे ‘म्हादय वार्ता’चे एक मुख्य उद्दिष्ट आहे.

सोबतच, पत्रकारितेच्या गुणधर्मांसह संयुक्त असलेले ‘म्हादय वार्ता’ हे मराठीतील एक लोकप्रिय अभिव्यक्ती व्यासपीठसुद्धा आहे. त्यामुळे, येथे ‘म्हादय वार्ता’च्या संदर्भात अभिप्रेत असल्याप्रमाणे ‘विश्लेषणात्मक पत्रकारिता’ म्हणजे ‘पत्रकारितेची एक अशी अभिनव व बृहद शाखा ज्यामध्ये फक्त प्राप्त बातमी अथवा घडामोडीच्या वृत्तांकनावर अवलंबून न राहता त्या बातमीचे सखोल विश्लेषण, घटनेचे विविध पैलू, त्यावर टीका आणि अंदाज व प्रामाणिक परीक्षणाचे वृत्तांकन करणे, इत्यादी. अंतर्भूत आहे. ‘माहिती पत्रकारिता’ म्हणजे ‘जागतिक, राष्ट्रीय व स्थानिक पातळीवर घडणाऱ्या विविध घडामोडींची सखोल माहिती, शासन-प्रशासन पातळीवर व विविध आस्थापनांद्वारे जाहीर होणारे उपक्रम, योजना, प्रकल्प, सेवा-सुविधा, निर्णय, सांखिकी, अहवाल, पाहणी, आदींची इत्यंभूत माहिती तसेच मानवी समाज व वाचकवर्गाच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित महत्त्वपूर्ण माहितीचा वाचकांपर्यंत प्रसार व पुरवठा करणारी पत्रकारितेची शाखा.

वर उल्लेख केलेल्या सगळ्या बाबींसह एक स्वतंत्र, निरपेक्ष, निर्भीड, निष्पक्ष, सर्वसमावेशक व भेदभावरहित वृत्त, माहिती व वाचनसेवा पुरवण्यास म्हादय वार्ता प्रयत्नरत व कटिबद्ध आहे. ‘म्हादय वार्ता’ कोणत्याही राजकीय व सामाजिक पक्ष अथवा संघटनेच्या दडपणाखाली काम करत नाही किंवा कोणत्याही विशिष्ट विचारसरणीचा प्रसार-प्रचार करत नाही. म्हादय वार्ताला कोणत्याही सद्या कोणत्याही स्वरुपात अनुदान मिळत नाही किंवा विनाकरार अथवा गैरव्यवहाराच्या स्वरुपात निधी प्राप्त नाही. हे एक स्वतंत्र व वाचकांच्या प्रेमावर उभे असलेले व्यासपीठ आहे.

mhadaivarta वर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या आणि वाचकांच्या जाहिरातीतील मजकुराशी आम्ही म्हादय वार्ता संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही, जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार जाहिरात प्रसिद्ध होते, त्यामुळे जाहिरातदारांशी आर्थिक व्यवहार करताना एकदा खात्री करूनच करा. धन्यवाद!!

~ संपादक – म्हादय वार्ता


बातमी Share करा:
error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!