Latestराजकारणस्थानिक बातम्या

लोकसभा निवडणूकीत सत्तरी तालुक्यात विक्रमी मतदान.

बातमी Share करा:

लोकसभा निवडणूकीत सत्तरी तालुक्यात विक्रमी मतदान.

भाजपाला मोठ्या मतांची आघाडी मिळण्याची शक्यता.

 

 

लोकसभा निवडणुकीच्या उत्तर गोव्याच्या मतदारसंघासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत आज सत्तरी तालुक्यात एकूण

78.28 टक्के मतदान झाले .यामध्ये वाळपई मतदारसंघांमध्ये 81.04

टक्के तर पर्ये मतदार संघामध्ये 75.52

टक्के मतदान होण्याचा प्रकार घडला. यामुळे चांगल्या पद्धतीचे मतदान झाल्याने त्याचा निश्चितच भाजपाला फायदा होईल. मोठ्या प्रमाणात मतदारांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याच्या उद्देशाने मतदान केल्याचा दावा पर्यायाच्या आमदार डॉ. देविया राणे यांनी व्यक्त केलेला आहे. त्याचप्रमाणे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी पर्ये व वाळपई या दोन्ही मतदारसंघातून भाजपाला मोठे मताधिक्य प्राप्त होईल असा दावा केलेला आहे.

 

दरम्यान मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. नऊ वाजेपर्यंत मतदारांचा अल्प प्रतिसाद लाभल्याचे चित्र पाहावयास मिळाले. अवघे 13 टक्के मतदान झाले होते .त्यानंतर दुपारी एक वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी वाढली दुपारी. 1 वाजेपर्यंत सरासरी 50 टक्के मतदान झाले होते. तर दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी जवळपास 70 टक्केवर पोहोचली होती.

काही मतदान केंद्रावर सकाळी नऊ वाजेपर्यंत मतदानात झाले नाही. तर काही ठिकाणी चांगल्या प्रकारचे मतदान झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले .सत्तरी तालुक्याचे उपजिल्हाधिकारी निलेश धायमोडकर हे सातत्याने वेगवेगळ्या मतदार केंद्राची सातत्याने संपर्कात होते. कोणत्याही ठिकाणी अडचणी निर्माण होऊ नये यासाठी ते तत्परतेने नजर ठेवून होते.

 

 

होंडा या ठिकाणी मशीन बिघडले.

 

दरम्यान प्राप्त माहितीनुसार होंडा पंचायत क्षेत्रातील बुथ क्रमांक 49 यावर मतदान करणारे मशीन काही काळासाठी बिघडले. यामुळे बऱ्याच प्रमाणात धावपळ सुरू झाली. शेवटी तालुक्याचे उपजिल्हाधिकाऱ्यानी सदर ठिकाणी योग्य प्रमाणात व्यवस्थापन करून अवघ्या एक तासांमध्ये मशीन दुरुस्ती करण्याची प्रक्रिया राबविली. यामुळे मतदारांना काही प्रमाणात ताटकळत राहावे लागले. काही मतदार मशीन मोडल्यामुळे माघारी परतले. मात्र संध्याकाळी पर्यंत त्यांनी पुन्हा येऊन मतदान केल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे.

 

 

मुरमुणे मतदान केंद्रावर मशीन बिघडले.

 

दरम्यान प्राप्त झालेल्या माहितीनुसार गुळेली पंचायत क्षेत्रातील मुरमुणे या ठिकाणी मशीन बिघडल्यामुळे मतदारांची तारांबळ उडाली. त्याचप्रमाणे सदर ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना धावपळ करावी लागली. एवढी दोन तासानंतर दुसरे मशीन बसविण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी मतदान पुन्हा एकदा सुरू करण्यात आले. यामुळे या मतदानाचा कोणत्याही प्रकारचा परिणाम झाला नाही असे यावेळी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!