निराधार सत्यवती चारी हीला मंत्री विश्वजीत राणे यांचा आधार
नवीन घरकुल उभारणार.
वाळपई नगरपालिका क्षेत्रातील वेळूस याठिकाणी सत्यवती चारी यांचे घर कोसळल्यामुळे
बेघर होण्याची पाळी या कुटुंबावर आली. यामुळे समाजातील दात्याकडून मदत करावी अशा प्रकारची विनवणी करण्यात आल्यानंतर याची विशेष दखल घेऊन गोवा राज्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी घेतली व या कुटुंबाला नवीन घर बांधून देण्याचे आश्वासन दिले आहे. या संदर्भाची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली. यामुळे विश्वजीत राणे यांच्या एकूण भूमिके संदर्भात नागरिकाकडून व सदर कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केलेला आहे.
याबाबतची माहिती अशी की वेळूस येथील सत्यवती चारी या निराधार महिलेचे घर दोन दिवसापूर्वी कोसळले. घराचा निम्मा भाग पूर्णपणे कोसळल्यामुळे उर्वरित भाग धोकादायक बनलेला आहे .पावसाळ्यापूर्वी याची दुरुस्ती न केल्यास कोणत्याही क्षणी उर्वरित घर कोसळण्याची भीती होती.यामुळे सत्यवती चारी यांनी अनेक जणांकडे यासंदर्भात विनंती केली. मात्र कोणीही तिला मदत करण्यासाठी पुढे आला नाही. शेवटी या संदर्भाच्या बातम्या वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर गोवा राज्याचे आरोग्य मंत्री व स्थानिक आमदार विश्वजीत राणे यांनी याची विशेष दखल घेतली व सदर कुटुंबाला नवीन घर बांधून देण्याचे आश्वासन त्यांनी दिलेले आहे. या संदर्भाची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे. त्यांनी आपल्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांना पाठवून एकूण या संदर्भाची पाहणी करण्याचे निर्देश दिले .त्यानुसार सदर कर्मचाऱ्यांनी या संदर्भाची पाहणी केली असून त्या संदर्भाची सविस्तरपणे माहिती प्राप्त केली असून या संदर्भाचा अहवाल विश्वजीत राणे यांना सादर करण्यात येण्यात असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान मंत्री विश्वजीत राणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सत्यवती चारी हिला घर बांधून देण्याचे जबाबदारी आपण घेतलेली आहे .आतापर्यंत वाळपई व पर्ये या दोन्ही मतदारसंघातील अनेक निराधारांना घर बांधून देण्यात आलेली आहे. यामुळे सत्यवती चारी हिला घर बांधून देण्यात नवीन असे काही नाही .मात्र या कुटुंबाला आधार मिळावा ही महत्त्वाची बाब आहे .पावसाळ्यापूर्वी शक्य तेवढ्या लवकर नवीन घर बांधून देण्यात येणार आहे. यासंदर्भाची प्रक्रिया आजपासूनच सुरू करण्यात आलेली आहे असे यावेळी त्यांनी सांगितले .या महिलेला पावसाळ्यामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होणार नाही याची विशेष दखल घेण्यात येणार असून त्यापूर्वीच नवीन घराची संकल्पना निश्चितच साकार होईल अशी आशा विश्वजीत राणे यांनी व्यक्त केलेली आहे. ज्या पद्धतीने सत्यवती चारी या अशा पडक्या घरामध्ये राहत होत्या ते खरोखरच दुर्दैव स्वरूपाची आहे .याबाबतची माहिती आपल्याला पूर्वीच पोचली असती तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती अशी प्रतिक्रिया विश्वजीत राणे यांनी व्यक्त केली. या घराची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. कारण उर्वरित भाग कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही. यामुळे या घरात सदर कुटुंबाने राहणे सुद्धा धोकादायक आहे असे राणे यांनी स्पष्ट केले. यामुळे येणाऱ्या चार-पाच दिवसांमध्ये नवीन घराच्या बांधकामाची प्रक्रिया निश्चितचपणे हाती घेण्यात येईल असे यावेळी राणे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान या संदर्भात सत्यवती चारी यांची भेट घेऊन त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी सांगितले की विश्वजीत राणे यांनी आपल्या गरीब परिस्थितीची दखल घेऊन आपल्याला नवीन घर बांधून देण्याची दिलेले आश्वासन यामुळे जगण्याची नवी ऊर्जा निर्माण झालेली आहे. एका बाजूने घरातील दारिद्र परिस्थिती व दुसऱ्या बाजूने धोकादायक अवस्थेत असलेले घराचे छप्पर यामुळे दररोज डोक्यावर टांगती तलवार होती .सुदैवाने ज्यावेळी घराचे छप्पर कोसळले त्यावेळी आपण व आपल्या घरातील मंडळी घरामध्ये नव्हती. अन्यथा विचित्र घडले असते असे सत्यवती चारी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान विश्वजीत राणे यांनी या गरीब कुटुंबाला दिलेला आधार यामुळे एका कुटुंबासमोर निर्माण झालेली गंभीर स्वरूपाची परिस्थिती हातावेगळी होण्यास मदत मिळाली अशी प्रतिक्रिया भागातून व्यक्त होताना दिसत आहेत