झर्मे येथील शंभरी पार क्रिष्णा नाईक ६० वर्षे लईराई देवीच्या चरणी लीन.
झर्मे येथील शंभरी पार क्रिष्णा नाईक म्हणतो लईराई देवीच्या व्रतात चैतन्य समाविले आहे.
गेली अनेक वर्षे प्रामाणिक व पवित्र मनाने देवीची व्रत करणाऱ्या झर्मे सत्तरी येथील कृष्णा नाईक यांचा सहकारी धोंडगणातर्फे तळावर सत्कार करण्यात आला. त्यांचे वय १०० वर्षे झाले आहे. गेल्या साठ वर्षापासून ते व्रत करीत आहेत. देवीची जत्रा जवळ आली व व्रत सुरू झाले हे वेगळ्याच प्रकारचे समाधान होत असते. देवीचे रूप डोळ्यासमोर येत असते.
एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा अंगामध्ये निर्माण होत असते. जोपर्यंत अंगामध्ये श्वास आहे. तोपर्यंत देवीचे व्रत अखंडितपणे करणार आहे. कारण गेल्या साठ वर्षांमध्ये देवीचे व्रत करताना एक चांगला प्रकारचा अनुभव. चांगल्या प्रकारची अनुभूती आली आहे. कृष्णा नाईक यांनी या संदर्भात दिलखुलासपणे चर्चा केली.