कुंभारखण येथील नवीन पुलाच्या अपूर्ण जोड रस्त्यामुळे अपघाताचा धोका.
- कुंभारखण येथील नवीन पुलाच्या अपूर्ण जोड रस्त्यामुळे अपघाताचा धोका.
वाळपई होंडा मार्गावरील कुंभारखण या ठिकाणी नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या अपूर्ण जोड रस्त्याच्या कामामुळे अपघातात धोका वाढलेला आहे. दोन्ही बाजूने जोड रस्ता अपूर्ण स्वरूपाचा आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालक व प्रवाशांना मोठा धोका निर्माण झालेला असून या अपूर्ण अवस्थेत असलेल्या जोड रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे अशा प्रकारची मागणी जोर धरू लागलेली आहे. याप्रकरणी स्थानिक आमदार डॉ देविया राणे यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे अशा प्रकारचे मागणी संबंधितांकडून करण्यात आलेली आहे
Video Player
00:00
00:00