कोपार्डे सरकारी प्राथमिक विद्यालयातर्फे अनोख्या पद्धतीने आषाढी एकादशी उत्साहात.
कोपार्डे सरकारी प्राथमिक विद्यालयातर्फे अनोख्या पद्धतीने आषाढी एकादशी उत्साहात.
कोपर्डे सत्तरी येथील सरकारी प्राथमिक शाळेमध्ये आषाढी एकादशीच्या सण- उस्ताहात साजरा करण्यात आला .विद्यालयाचे शिक्षक विष्णू कुडतरकर यांनी
अनोख्या पद्धतीने हा सण साजरा करण्यावर विशेष भर दिली. श्री ब्राह्मणी महामाया देवस्थानच्या प्रांगणात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे मुलाबरोबरच पालकांनी सुद्धा यामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या दिंडीच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना मुलांनी आनंद घेतला. यावेळी मोठ्या प्रमाणात पालक व नागरिकांची उपस्थिती होती.