अखिल गोवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे शनिवारी 29 रोजी साखळी रवींद्र भवन येथे मुख्यमंत्र्याहस्ते शानदार उद्घाटन.
अखिल गोवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे शनिवारी 29 रोजी साखळी रवींद्र भवन येथे मुख्यमंत्र्याहस्ते शानदार उद्घाटन.
आमदार डॉ देविया राणे, डॉ चंद्रकांत शेट्ये, प्रेमेंद्र शेट उपस्थित राहणार.
12 जेष्ठ पत्रकाराचा सत्कार करणार.
गोव्याच्या मुक्ती नंतर गोव्याच्या विकासाला चालना मिळाली. ग्रामीण भागाचा विकास झपाट्याने होऊ लागला. ग्रामीण भागामध्ये असलेल्या अनेक समस्याचे निवारण होण्यासाठी वर्तमानपत्राच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधनाचे कार्य ग्रामीण भागातील पत्रकारांनी केले. अत्यंत प्रभावी व निस्वार्थीपणे केलेले कार्य अजून पर्यंत सरकारने दखल घेतलेली नाही. यामुळे गोव्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांची संघटना स्थापन करून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य येणाऱ्या
काळात गोवा गोव्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांची संघटना स्थापन करून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य येणाऱ्या काळात अखिल गोवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्यावतीने करण्यात येणार आहे .मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या प्रेरणेतून ही संघटना स्थापन झालेली आहे. यामुळे येणाऱ्या काळात ग्रामीण भागातील पत्रकारांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात .यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून या संघटनेचे शानदार उद्घाटन शनिवार दिनांक 29 जून रोजी सकाळी 10.30 वाजता साखळी रवींद्र भवन येथे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या शुभहस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे .यामुळे या कार्यक्रमाला गोव्याच्या ग्रामीण भागातील पत्रकारांनी शहरी पत्रकारांनी त्याचप्रमाणे समाजाच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन अखिल गोवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्यावतीने साखळी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून करण्यात आले आहे.