वाढणारे कर्करोगाचे 90% प्रमाण तंबाखूजन्य पदार्थामुळेच– कर्करोग तज्ञ डॉ. जगदीश काकोडकर.
वाढणारे कर्करोगाचे 90% प्रमाण तंबाखूजन्य पदार्थामुळेच–
कर्करोग तज्ञ डॉ. जगदीश काकोडकर.
वाळपई येथील कर्करोग तपासणी शिबिराला चांगला प्रतिसाद.
https://youtu.be/ldbHyfuuXmM?si=3pLWNUl2-3c1D4m0
वाळपई प्रतिनिधी
गोव्यामध्ये कर्करोगाचे वाढते प्रमाण चिंताजनक स्वरूपाचे आहे. यामुळे आता प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. आरोग्याच्या छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. तपासणी करा. यातून येणारा धोका आपल्याला टाळता येईल .सध्या वाढणारे कर्करोगाचे प्रमाण हे 90% तंबाखूजन्य पदार्थामुळे आहे .यामुळे प्रत्येकाने तंबाखूजन्य पदार्थाच्या बाबतीत सतर्क राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कर्करोग तज्ञ डॉ. जगदीश काकोडकर यांनी केले आहे.
गोवा मेडिकल कॉलेज आरोग्य खाते व वाळपई सरकारी सामाजिक रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यामन आयोजित करण्यात आलेल्या कर्करोग तपासणी शिबिराच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.