कुंभारखण पिसुर्ले येथे साकारला ग्रीन बुथ.
मतदारांच्या स्वागतासाठी कुभांरखण सत्तरी येथील ग्रीन बुथ मतदान केंद्र सज्ज.
पर्यावरणापुरक देखाव्याने सजले मतदान केंद्र.
लोकसभेसाठी ७ में रोजी निवडणूक होणार आहे .या संदर्भाची जय्यत तयारी सध्या सुरू आहे .सकाळी ७ वाजल्यापासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वेगवेगळे मतदान केंद्रावर मतदान होणार आहे .जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी सरकारतर्फे प्रयत्न करण्यात येत आहे .
सत्तरी तालुक्यातील याची जय्यत तयारी सुरू आहे. येणाऱ्या मतदारांना चांगल्या प्रकारचे वातावरण निर्माण व्हावे व पर्यावरणीय दृष्ट्या मतदान करताना एक वेगळ्या प्रकारचा आनंद निर्माण व्हावा यासाठी सत्तरी तालुक्यातील पर्ये मतदार संघातील पिसुर्ले पंचायत क्षेत्रातील कुंभारखण या ठिकाणी हरित मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आलेली आहे. पूर्णपणे पर्यावरण पूरक सजावट करण्यात आली असून सुरेख रांगोळी घातलेली आहे. यामुळे या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक मतदारांना एक वेगळ्याच प्रकारचे समाधान प्राप्त व्हावे. या दृष्टिकोनातून या मतदान केंद्राची रचना करण्यात आलेली आहे. सत्तरी तालुक्याचे उपजिल्हाधिकारी निलेश धायमोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मतदान केंद्र तयार करण्यात आले असून यासाठी सदर मतदान केंद्रावर कार्यरत असलेले कर्मचारी विद्यालयाच्या प्रांगणात काम करणारे शिक्षक वर्ग व गावातील ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हे मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे .हे मतदान केंद्र पाहण्याजोगे आहे .यामुळे पर्यावरण पूरक मतदान केंद्र कशाप्रकारे असू शकते याचे चांगले उदाहरण म्हणजेच कुंभारखण या ठिकाणी असलेले हरित मतदान केंद्र. यामुळे या मतदान केंद्रावर निश्चितपणे भेट द्या व हरित मतदान केंद्राची संकल्पना कशी आहे हे पाहण्याची संधी मतदार व नागरिकांना प्राप्त होणार आहे.