पाडेली स्वयं अपघातात २२ वर्षिय तरुणाचा मृत्यू.
पाडेली स्वयं अपघातात २२ वर्षिय तरुणाचा मृत्यू.
रविवारी रात्री 8.45 सुमारास पाडेली सत्तरी येथील रुषिकेश राजेश गावडे या 22 वर्षे तरुणाला स्वय अपघातात मरण येण्याची दुर्दैवी घटना घडली. मयताचे नाव ऋषिकेश राजेश गावडे असे असून तो गावडेवाडा पाडेली या ठिकाणी राहणार आहे .वाळपई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऋषिकेश गावडे आपली दुचाकी GA04N3283 होंडा एक्टिवा घेऊन गुळेली ्च्या दिशेने जात होता. गाडीवर त्याचे नियंत्रण सुटले व रस्त्याच्या बाजूला असलेल्या दगडी चिऱ्याना त्याच्या गाडीने धडक दिली. यावेळी त्याला जबर मार बसला. डोक्यावर हेल्मेट नसल्यामुळे डोक्याला जबर जखम झाली.
याबाबतची माहिती मिळताच शेखर लक्ष्मण सावईकर यांनी ताबडतोब त्याला वाळपईच्या सरकारी सामाजिक रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी त्याला मृत घोषित केले.
या संदर्भात पोलिसांकडून दिलेले अधिक माहितीनुसार एका वळणावर त्याचे गाडीचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला .हा अपघात एवढा जबरदस्त होता की गाडीची मोठ्या प्रमाणात नुकसानी झालेली आहे. दरम्यान ऋषिकेश गावडे याला दुर्दैवी मृत्यू आल्यामुळे भागामध्ये खळबळ निर्माण झालेली आहे .वाळपई पोलीस स्थानकाचे सहाय्यक उपनिरीक्षक नवनाथ गावस यांनी घटनास्थळी धाव घेऊन एकूण घटनेचा पंचनामा केला. सध्या सदर मृतदेह वाळपई सरकारी सामाजिक रुग्णालयाच्या शवागारामध्ये ठेवण्यात आलेला आहे. सोमवारी सकाळी गोवा मेडिकल कॉलेज येथील उत्तररीय तपासणी करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
दरम्यान ऋषिकेश गावडे हा दुचाकी घेऊन कुठे जात होता या संदर्भाची माहिती मात्र मिळू शकलेली नाही. मात्र गावडेवाडा पाडेली या ठिकाणी सदर कुटुंबा राहात आहे. त्याचे वडील राजेश हे गुळेली याठिकाणी गाडा चालवीत आहेत. घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची असल्यामुळे जगण्यासाठी सदर कुटुंब बराच संघर्ष करीत आहेत.
वाळपई पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक अल्लाउद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नवनाथ गावस अधिक तपास करीत आहेत .वाळपई पोलीस स्थानकावर या संदर्भाचा गुन्हा नोंद करण्यात आलेलाआहे.