गोवादेश-विदेशराजकारणसंपादकीयसमाजकारणस्थानिक बातम्या

ठाणे त्रैवार्षिक घोडेमोडणी उत्सवामध्ये १४ घोड्यांचा नृत्याविष्कार.

बातमी Share करा:

वाळपई प्रतिनिधी

हजारोंच्या संख्येने भाविकांच्या साक्षीने उत्सव साजरा.
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, आमदार डॉ देविया राणे यांच्याकडून विधिवत पूजन.
ठाणे सत्तरीतील सात भावांच्या घोडेमोडणी उत्सवाला हजारोच्या भाविकांनी उपस्थिती लावली .रात्रभर १४ घोड्यांचा नृत्यविष्कार पाहण्याची संधी भाविकांना नागरिकांना उपलब्ध झाली .परंपरेचे मुख्य आकर्षण असलेला ह घोडेमोडणी उत्सव ठाणे सत्तरी येथील मंडळगिरो कोळीगीरो मैदानावर उत्साहात सादर करण्यात आला .याची सांगता शनिवार दिनांक 30 रोजी पहाटे करण्यात आली.
ठाणे सत्तरी येथील मंडळगिरो कोळीगीरो या देवस्थानचा त्रैवार्षिक घोडेमोडणी उत्सव यंदा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ठाणे पंचक्रोशीतील सात गावातील नागरीक व भाविक यांच्या थेट उपस्थितीत हा पारंपारिक उत्सव साजरा करण्यात आला.१४ घोड्यांचा नृत्याविष्कार पाहण्यासाठी गोव्याच्या वेगवेगळ्या भागातून त्याचप्रमाणे कर्नाटक व महाराष्ट्रतून मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी जमली होती.

या उत्सवात गोव्याच्या वेगवेगळ्या क्षेत्रातून अनेकांनी आपली उपस्थिती लावली. भागाचे आमदार डॉ देविया राणे यांनी व गोवा राज्याच्या आरोग्यामध्ये विश्वजीत राणे संपत्नीक भेट देऊन सर्व घोड्यांची विधिवत पूजन केले. त्याचप्रमाणे या पारंपारिक उत्सवांमध्ये भाग घेतला.

देव दर्शनासाठी भाविकांची गर्दी.मंडळगिरो कोळीगीरो या देवस्थानच्या दर्शनासाठी भाविकांनी दुपारपासून रांग लावली होती .मोठ्या प्रमाणात भाविकांनी देवदर्शनाचा लाभ घेतला. सुंदर आयोजन व विद्यूत रोषणाई यामुळे लखलखाट यामुळे या उत्सवामध्ये उत्खंठा निर्माण झाली होती. मंडळगिरो कोळीगीत हे मैदान विस्तीर्ण असे पठार आहे. या पठारावर मोठ्या प्रमाणात भाविकांच्या उपस्थितीत या पारंपरिक घोडेमोडणी म उत्सवाला संध्याकाळी ३ वाजताच्या सुमारास सुरुवात करण्यात आली.

घोड्यांची हातभेट महत्त्वाचा क्षण.या घोड्यामध्ये उत्सवामध्ये एकूण 14 घोड्यांचा समावेश असतो. वेगवेगळ्या देवस्थानातील घोडे तयार करून भाविकांच्या उपस्थितीत घोडे मोडणीच्या स्थानी येत असतात. यावेळी ठाणे देवस्थानतर्फे त्यांचे धार्मिक व पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात येत असते. याला हात भेट असे म्हणतात .ही हातभेट पाहण्यासाठी भाविकांची व नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मानसन्मानाने त्यांना या घटनास्थळी आणण्यात येत असते. यावेळी पारंपरिक वादन हे विशेष आकर्षण असते. शुक्रवारी दुपारी तीन वाजल्यापासून ही हातभेट करण्यात आली. वेगवेगळ्या भागातून आलेल्या घोड्यांची विधिवत पूजन करून त्यांना हातभेट करून या सोहळ्यामध्ये सहभागी करून घेण्यात आले.

पाच वाजल्यापासून चौदा घोड्यांचा नृत्य आविष्कार. संध्याकाळी ५ वाजल्यापासून शुक्रवारी 14 घोड्यांचा नृत्यविष्कार सुरू झाला. पारंपरिक वादन व एकाचवेळी हा नृत्यविष्कार एक वेगळ्या प्रकारचे आकर्षण होते .घोड्यांच्यामागोमग मोठ्या प्रमाणात भाविकांनी या नृत्याविषरामध्ये भाग घेतला. हे नयनरम्य चित्र पाहण्यासाठी एक वेगळ्याच प्रकारचे आनंद असतो. या आनंदामध्ये भावीक व नागरिक सहभागी झाले.

नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. या त्रैवार्षिक घोडेमोडणी उत्सव यामध्ये अनेकजण आपल्या विविध मागण्यासाठी देवाला नवस करत असतात. हा नवस त्रैवार्षिक घोडेमोडणी उत्सवात द्यावा लागतो. हा नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. सर्व घोड्यांचे विधिवत पूजन व त्यांना शाल अर्पण करून हा नवस फेडला जातो. त्याचप्रमाणे आपण सांगितल्याप्रमाणे देवाला साहित्य अर्पित करावे लागते. जवळपास तीन तास नवस फेडण्याचा कार्यक्रम मैदानावर सुरू होता.
यामध्ये गोव्याच्या वेगवेगळ्या भागातून भाविकांनी मोठ्या प्रमाणात नवस फेडण्यासाठी गर्दी केली होती.

तीन तास नवस फेडण्याचा कार्यक्रम. या त्रैवार्षिक घोडेमोडणी उत्सवामध्ये सार्वजनिक सांगणे घालण्याची पद्धत आहे. वेगवेगळ्या कारणासाठी देवाला नवस करून घराणे घालण्याची पद्धत या ठिकाणी प्रचलित झालेली आहे. हाकेला पाहणारा मंडळगिरो कोळीगीरो अशी आख्यायिका निर्माण झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक देवदेवताना नवस करतात व तो घोडेमोडणी उत्सवामध्ये पावन करतात. तीन तास नवस करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .यावेळी वेगवेगळ्या गावातील प्रमुख भाविकांची उपस्थिती होती.

विविध मान्यवरांची खास उपस्थिती. या उत्सवामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांची खास उपस्थिती होती. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे आमदार डॉ देविया राणे यांनी या सोहळ्यामध्ये भाग घेऊन देवदर्शनाचा त्याचप्रमाणे घोड्यांच्या विधिवात पूजेला मध्ये भाग घेतला. 14 घोड्यांना त्यांनी पुष्पहार व शाल अर्पण केली. त्यानंतर त्याने देवदर्शनाचा लाभ घेतला.

ठाणे घोडेमोडणी उत्सव परंपरेची श्रीमंती

मंत्री विश्वजीत राणे
आमदार डॉ देविया राणे.

ठाणे सत्तरी या ठिकाणी सात भावांची घोडेमोडणी हा या भागातील परंपरागत उत्सव आहे. या उत्सवामध्ये गोव्याच्या वेगवेगळ्या भागापासून मोठ्या प्रमाणात भाविक सहभाग घेत असतात. आपला नवस फेडण्यासाठी व देवदर्शनाचा लाभ घेत असतात अशा प्रकारची पारंपरिक संस्कृती आपल्या धर्म व समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. अशा उपक्रमाच्या माध्यमातून भाविकांना व नागरिकांना एकसंघ होऊन परस्परांमध्ये आनंद निर्माण करण्याची चांगली पद्धत प्रचलित झालेली आहे. सात गावाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. हे भाव एकसंघ होऊन हा उत्सव सादर करत असतात .दरवर्षी याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद असतो अशी प्रतिक्रिया यावेळी मंत्री विश्वजीत राणे यांनी व्यक्त केली. अशा प्रकारची परंपरा अखंडितपणे सुरूच ठेवण्यासाठी सर्वांनी एकसंघ व्हावे अशा प्रकारची विनंती यावेळी मंत्री विश्वजीत राणे यांनी व्यक्त केली.

आमदार डॉ देविया राणे यांनी यावेळी बोलताना हा उत्सव सत्तरी तालुका त्याचप्रमाणे गोमंतकामध्ये विशिष्ट स्वरूपाची परंपरा सिद्ध करणारा आहे .हजारोच्या संख्येने भाविक या उत्सवामध्ये भाग घेत असतात. हे खरोखरच भूषणावर आहे.मंडळगिरो कोळगिरो या देवदेवतांची वेगळी अशी आख्यायिका आहे .या पठारावर चौदा घोड्यांचा नृत्याविष्कार पाहण्याची संधी गोव्यातील भाविकांना व नागरिकांना उपलब्ध झालेली आहे .चांगल्या प्रकारचे आयोजन या सात भावांच्या घोडेमंडळी आयोजन समितीने केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे कौतुक केले.

ठाणे येथील पारंपारिक घोडेमोडणी उत्सवामध्ये घोड्यांचा नृत्याविष्कार
सादर करण्यात आला.

या परंपराग उत्सवामध्ये मंत्री विश्वजीत राणे व आमदार डॉ देविया राणे यांनी पूजन केले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!